Diet chart for diabetes patient in marathi

Diet chart for diabetes patient in marathi

  Diet chart for diabetes patient in marathi – आजच्या फास्ट लाईफ स्टाईल मध्ये डायबिटीज चे पेशंट खूप वाढले आहेत. डायबिटीज म्हणजे शुगर.  आपण मराठी बोलीभाषेमध्ये शुगर पेशंट असे म्हणतो. 

डायबिटीज एक अनुवंशिक आजार आहे.  अनुवंशिक म्हणजे वडिलांच्या कडून मुलाला,  मुलांच्या कडून त्याच्या नातवाला . म्हणजे  एका फॅमिली मध्ये तो असतो. 

पण अलीकडे आजची फास्ट लाईफस्टाईल ,व्यायामाचा अभाव, जंकफूड चे अतिसेवन , बैठे काम , स्ट्रेस या सर्व कारणामुळे शुगर चे पेशंट खूप वाढले आहेत.

diet chart for diabetes patient in marathi

शुगर च्या पेशंटला प्रत्येक वेळेला ही भीती सतावत असते की, मी काय खाऊ आणि काय नको, आणि जे खायचा आहे ते मी किती मात्रेमध्ये खाऊ, त्यामुळे माझी शुगर लेवल वाढणार नाही. ती कंट्रोलमध्ये राहील.

आजच्या आपल्या लेखामध्ये मी तुम्हाला ही माहिती देणार आहे की ,शुगर च्या पेशंटला काय खाल्लं पाहिजेे? काय नाही खाल्लं पाहिजे ? आणि जे खायचा आहे ते किती मात्रेमध्ये खाल्लं पाहिजे ? शुगर पेशंट चा पूर्ण diet plan सांगणार आहे.

डायबिटीस पेशंट ने काय खाऊ नये । शुगर पेशंट ने काय खाऊ नये

आता आपण बघुया जे पदार्थ शुगर पेशंट ने पूर्णतः वर्ज्य केले पाहिजेत . ते आहेत, .डीप फ्राय ,जंक फूड म्हणजे की भजी, समोसा ,पिझ्झा ,पास्ता ,बर्गर हे पूर्ण पदार्थ बंद केले पाहिजेत.

सगळ्यांनाच माहीत आहे की, गोड पदार्थ डायबिटीस पेशंट ने खायचे नाहीत . तर गोड पदार्थ कोणकोणते तर साखर ,गोड मध, मिठाई, पेढे ,बर्फी ,केक, आईस्क्रीम ,कोल्ड्रिंक्स, बेकरी प्रॉडक्ट हे पूर्ण बंद करायला पाहिजेत.

बेकरी प्रॉडक्ट_ म्हणजे ब्रेड, टोस्ट ,बटर, खारी , पाव बिस्किटे. त्याच्याबरोबर जास्त कार्बोहायड्रेट्स असणाऱ्या फळभाज्या सुद्धा बंद करायला लागणार. म्हणजे बटाटा, रताळी ,स्वीट पोटॅटो ,गाजर कॅरोट, बीट हेसुद्धा खायचं नाही.

फळांच्या मध्ये_ आंबा, चिकू, पेरू ,केळी ,अंगूर, द्राक्ष ,टरबूज, कलिंगड यामध्ये साखर जास्त असते .यामुळे साखर वाढते ते बंद करून टाका.

डायबिटीज चे पेशंट कोणत्याही प्रकारचे व्यसन न करावं .दारु, स्मोकिंग ,धूम्रपान ,तंबाखू ,मिश्री ,पान ,मावा हे पूर्णतः वर्ज्य केलं पाहिजे.

ज्वारी आणि बाजरीची भाकरी शुगर पेशंटला वर्ज्य असते. त्यामुळे शुगर पेशंट जास्तीत जास्त  चपाती खावी . शाबू च्या खीचडी मध्ये सुद्धा जास्त कार्बोहाइड्रेट असतात ते पण खाऊ नये. गव्हाची चपाती घ्या ,भाकरी कमीत कमी खावा.

डायबेटीस पेशंट थोड्या-थोड्या प्रमाणात खाऊ शकतो

आता बघूया ज्या वस्तू आपण थोड्या-थोड्या खाऊ शकतो.

चहा, कॉफी , फक्त चहा आणि कॉफी मध्ये साखर नसली पाहिजे. मटन ,अंड ,चिकन ,नॉनव्हेज कधीतरी आणि थोड्या प्रमाणात खाल्ले तरी चालते . एक दोन महिन्यातून नॉनव्हेज आणि एक दोन पीस खावे .

अंडी सुद्धा कधी कधीच खावीत .जे शाकाहारी पदार्थ थोडे खाल्ले पाहिजे ,ते आहेत वाटाणा ,पावटा आणि चवळी हे जरा जपूनच खावे.

डायबिटीस पेशंट ने भरपूर प्रमाणात खावीत अशा वस्तू

आता आपण बघूया की कोणते पदार्थ असे आहेत ,जे साखरेचे पेशंटने पोट भरून खाल्ली तरी चालतात. जुलाब वर औषध

हिरव्या पालेभाज्या _जसे की मेथी, पालक ,चाकवत ,कांद्याची पात, हिरव्या पालेभाज्या तुम्ही मनसोक्त खाऊ शकता.

फळभाज्यांच्या_ मध्ये सिमला मिरची ,कारली ,कोबी ,फ्लॉवर ब्रोकली ,गवारी ,काकडी ,शेवग्याची शेंग ,वांग ,लसून ,हिरवी मिरची ,भेंडी ,मुळा ,दोडका ,टोमॅटो हे तुम्ही भरपूर खाऊ शकता.

फळांच्या मध्ये _एप्पल ,सफरचंद ,संत्री ,मोसंबी, स्ट्रॉबेरी, डाळिंब ,नारळ पाणी हे घेऊ शकता.

नारळ पाणी ,ग्रीन टी, ॲलोवेरा, ज्यूस ,शुगर कमी करण्यासाठी मदत करतात.

शुगर पेशंट डाळ आणि डाळीचे पदार्थ भरपूर खाल्ले तरी चालतात .उडीद डाळ ,मुगाची डाळ ,तूर डाळ कोणतीही डाळी आणि डाळीचे वरण ,दाल तडका तुम्ही खाऊ शकत. 

शुगर पेशंट ने पाळावयाची पत्थ्ये

आता खाण्यापिण्याच्या सवयी यांच्या बद्दल बोलूया,  तुम्हाला कसं कसं खाल्लं पाहिजे ,किती वेळा खाल्लं पाहिजे, किती मात्रेमध्ये खाल्लं पाहिजे.

नॉर्मली माणूस दोन वेळी पोटभर जेवण करतो. साखर च्या पेशंटला असे चालत नाही ,यामुळे शुगर लेवल एकदम आणि जास्त वाढते .साखरेच्या पेशंट ने थोडं-थोडं नी दिवसातून 4 वेळा खाल्लं पाहिजे.

सकाळी आठ वाजता नाश्ता शंभर टक्के करावा . नाश्ता केल्याशिवाय घरातून बाहेर पडू नये , याच्या नंतर प्रत्येक चार तासाने तुम्हाला काही ना काही तरी खाल्लं पाहिजे .थोडं थोडं भरपूर वेळा खायचं .

बारा वाजता तुम्ही तुमचं रेग्युलर जेऊ शकता .चार किंवा पाच वाजता तुम्हाला थोडासा हलका नाश्ता करायला लागणार ,आणि रात्री नऊ ते दहा या वेळेत जेवावं. खूप वेळ उपाशी राहू नये. कितीही काम असलं तरी.

रोज चार ते पाच लिटर पाणी तुम्हाला प्यायलाच  पाहिजे. खिशामध्ये साखरेची एक पुडी ठेवावी .किंवा तुम्ही ग्लुकोज पावडर ठेवू शकता . Love cooking ? Malai kofta recipe

जेव्हा तुम्हाला असं वाटेल की चक्कर येते, घाम येतोय ,डोळ्यासमोर अंधारी येते, अस्वस्थ वाटते तेव्हा लगेच तुम्ही तोंडामध्ये साखर किंवा ग्लुकोज पावडर टाका. ही सगळी साखर कमी झालेले ची लक्षण आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *