Low blood sugar level symptoms in marathi

Low blood sugar level symptoms in marathi

low blood sugar level symptoms in marathi –

Diabetes – साखरे चे बरेच जास्त पेशंट पाहिले जातात . ज्यांना साखरेचा आजार असतो त्यामध्ये एक भीती नेहमी पाहिली जाते की अचानक पणे शुगर कमी तर होणार नाही ना ?

साखर कमी करण्याची औषधे असतात , त्यांचा जर डोस जास्त असेल , जेवण एकदम कमी गेलं असेल, किंवा काम खूपच जास्त झाला असेल , तर शुगर लेवल कमी होऊ शकते.

शुगर लेवल एकदम कमी झाली तर पेशंटसाठी धोकादायक बनू शकते . Read more – best foods for children’s brain development.

तर आपण शुगर लेवल कमी होण्याची शुरुवाती लक्षणे ओळखणे बरेच जास्त महत्त्वाचे आहे. तेव्हाच आपण येणाऱ्या धोक्यापासून वाचू शकतो.

तर आजच्या या आर्टिकल मध्ये आपण शुगर लेवल कमी होण्याची लक्षणे बघणार आहोत.

low blood sugar level

नॉर्मल शुगर लेवल 60 पासून 140 पर्यंत आहे. जर शुगर 60 पासून खाली आली तर सुरुवातीला लक्षणे दिसू लागतील.

low blood sugar level symptoms in marathi । शुगर लेव्हल कमी झाल्याची लक्षणे ।

यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण लक्षण आहे – Sweating अचानकपणे एकाएकी बराच जास्त घाम येतो. जास्त भूक लागणे, डोकं दुखणे , ही लक्षणे जाणवतात.

पेशंट नॉर्मल पेक्षा वेगळा वागायला लागतो.

ठोके वाढल्यासारखे वाटतात. घशात कोरड पडते आणि ओठ कापायला लागतात. जशीजशी शुगर अजून कमी होईल तसे तसे दुसरी लक्षणे दिसू लागतात.

जर शुगर लेवल 40 पेक्षा कमी झाली तर नीट बोलता येत नाही. समोरचे अंधुक अंधुक दिसायला लागते.

ॲसिडिटी वाढते आणि उलटी आल्यासारखी वाटते . दोन दोन माणसे दिसू लागतात . हात कापायला लागतात .

पेशंट काही पण बोलायला लागतो आणि हळूहळू झोपेत जातो. पेशंट ला चक्कर पण येऊ शकते. जास्त शुगर कमी झाल्याने पेशंट बेशुद्ध पण पडू शकतो.

पेशंटला बोलण्यावर तो कोणताही रिस्पॉन्स देत नाही. तो डोळे पण उघडत नाही. तो बेशुद्धावस्थेत जातो.

जर शुगर च्या पेशंट ने तीन किंवा चार दिवसापासून व्यवस्थित खाल्लं असेल नसेल , तीन ते चार दिवसात बरेच जास्त काम केले असेल आणि साखरेची गोळी पण रेग्युलर घेतली नसेल .

आणि या अवस्थेमध्ये जर वरची लक्षणे पण दिसू लागली , तर समजून घ्या की शुगर लेवल जास्त प्रमाणात कमी झाली आहे.

जर सुरुवातीची लक्षणे जाणवत असतील तर लगेच फॅमिली डॉक्टरांना दाखवावे . जर पेशंट बेशुद्ध असेल तर लगेच हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करणे.

paneer tikka recipe in Marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *