Omee capsule in marathi

Omee capsule in marathi

ओमी कॅप्सूल – omee capsules in marathi , बऱ्याच लोकांना ऍसिडिटी म्हणजे पित्ताचा त्रास असतो. या लोकांमध्ये ही गोळी जास्त फेमस आहे.  बऱ्याच लोकांची सवय झाली आहे की ओमेकॅप ही गोळी रोज घेत असतात. बरेच लोक घरात तीन ते चार तरी स्ट्रिप्स घरी आणून ठेवतात. 

घरामध्ये कोणालाही पित्ताचा त्रास झाला की लगेच ओमी गोळी खातात .  त्याच्या बद्दल आपल्याला माहित आहे का की ज्यामुळे आपल्याला काही त्रास होऊ शकतो ? ह्याच्या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत . या लेखामध्ये ओमी कॅप्सूल ही आपल्याला काही त्रास देऊ शकते ? Omee capsule side effects in marathi । याचा काय फायदा होणार याबद्दल माहिती देणार आहे.

आता आपण ओमी कॅप्सूल च्या बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत. त्याचे dose  काय आहेत.ते कोणत्या कोणत्या आजारांमध्ये दिलं जातं, त्याचे साईड इफेक्ट काय काय आहेत. दुसरे औषधांच्या बरोबर त्याचं काय इंटरॅक्शन होतात का ? प्रेग्नेंसी मध्ये सेफ आहे का नाही. स्तनदा मातांचा मध्ये सेफ आहे का नाही याची पूर्ण माहिती घेऊया.

content of omee capsules in marathi

याचं कन्टेन्ट काय आहे ? याचं कन्टेन्ट आहे omeprazole . ओमेप्रझोल हे एक प्रोटन पंप inhibitor आहे .प्रोटन पंप पोटामध्ये ऍसिडिटी तयार करायचं काम करतात . हे जर proton पंप ब्लॉक झाले तर ऍसिडिटी तयार होत नाही.

आता याचा उपयोग बघूया – सगळ्यांनाच माहिती आहे , की ओमी कॅप्सूल ॲसिडीटीवर म्हणजे पित्तावर काम करते. कोणाला उलटी होत असेल ,छातीमध्ये जळजळ असेल यावर सुद्धा वापरली जाते.   

त्याच्याबरोबर दुसरे जे आजार आहेत . त्यामध्ये ऍसिड रिफ्लक्स डिसीज ACID REFLUX DISEASE म्हणजे करपट ढेकर येणे . GERD – Gastroesophageal reflux डिसीज . Ulcer पोटाचा अल्सर यामध्ये दोन प्रकार असतात .छोट्या आतड्याचा अल्सर आणि जठराचा अल्सर.

हा अल्सर म्हणजे अन्ननलिकेचा दाह होणे ,यामध्ये अन्ननलिकेला सूज आणि दाह होतो . त्याची लक्षणे आहेत ,सारखं सारखं उचकी येते ,यामध्ये ही ओमी कॅप्सूल वापरली जाते. Read this post in hindi.

Doses of omee capsules in marathi । ओमी कॅप्सुल

ओमी ही कॅप्सुल फॉर्ममध्ये आणि लिक्विड फॉर्ममध्ये येते . कॅप्सूल 20 एमजी ची असते आणि लिक्विड 2mg/ml यामध्ये. कॅप्सूल मोठ्या लोकांसाठी आणि लिक्विड लहान मुलांसाठी. लहान मुलांना पाच मिलि सकाळ-संध्याकाळ जेवणाअगोदर .

लिक्विड मोठ्या माणसांना सुद्धा देता येते. मोठ्यांचा डोस आहे 10 मिली सकाळ-संध्याकाळ जेवायच्या अगोदर . याचा कोर्स आपण जास्तीत जास्त चार ते सहा आठवडे देऊ शकतो.

ओमी कॅप्सूल चे साईड इफेक्ट । side effects of omee capsule in marathi।

जर तुम्ही रोज खूप महिने ही गोळी खात असाल तरच तुम्हाला याची साईड-इफेक्ट होणार. त्याचे साईड इफेक्ट काय काय आहेत? तर याचा रेजिस्टन्स resistance येतो . म्हणजे काय तर पित्ताच्या गोळीने सुद्धा पित्त कमी येत नाही .

डोकं दुखणं आणि पोट दुखणं ,टॉयलेटला पातळ होणे ,पोट फुगणे ,गॅस होणे ,चक्कर येणे ,आणि शौचालय साफ न होणे म्हणजे कॉन्स्टिपेशन हे चे साईड इफेक्ट आहेत.

Contraindication of omee capsule in marathi

जर तुम्ही झोपेची गोळी घेत असाल ,किंवा रक्त पातळ व्हायची गोळी घेत असाल किंवा चक्कर ची गोळी घेत असाल, तर ह्या गोळ्यांच्या बरोबर ओमी कॅप्सूल चालत नाही . ती घ्यायच्या अगोदर तुम्हाला डॉक्टरांना विचारलं पाहिजे .ओमी कॅप्सूल मुळे वरच्या गोळ्यांची ताकत वाढते.

ओमी कॅप्सूल प्रेग्नेंसी मध्ये सेफ नाही . म्हणजे प्रेग्नेंसी मध्ये माते ने omee capsule अजिबात घेऊ नये. जर तुमचा मुलगा छोटा असेल आणि तुम्ही त्याला दुध पाजत असाल तर , तुम्ही ही गोळी घेऊ शकता . त्याचा तुमच्या लहान मुलावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.

रोज ओमी ची गोळी खाऊ नये . तीन ते चार दिवसातून एक वेळा ती घ्यावी . जर तुम्ही रोज खूप महिने सलग गोळी घेतली तर तुम्हाला त्याचे साइड इफेक्ट्स भोगावे लागणार. Fungal infection in marathi.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *